Rupali Thombre Patil : ‘आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही’, चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया
रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्यावर रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेला खोटा गुन्हा फेटाळून लावला आहे. “आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही,” असे म्हणत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या बदनामीच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. कोणतीही अश्लील पोस्ट केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप केले. “बोंदू बाबा खरात” […]
रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्यावर रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेला खोटा गुन्हा फेटाळून लावला आहे. “आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, टरफलं उचलणार नाही,” असे म्हणत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या बदनामीच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. कोणतीही अश्लील पोस्ट केली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप केले. “बोंदू बाबा खरात” प्रकरण महाराष्ट्रातील महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे होते, तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांचे आरोपीसोबतचे फोटो होते. संवैधानिक पदावर असतानाही राज्यातील महिलांची इज्जत वेशीला टांगण्याचे काम चाकणकर यांच्यामुळे झाले, असा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला. चाकणकर यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल आपल्याला जेलमध्ये जाण्याची भीती नाही, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
Published on: Aug 24, 2026 08:08 PM
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...

