Special Report | रशिया युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? -Tv9
युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत अद्याप दिसून येत नाहीत. अशावेळी अजून एक मोठी बातमी समोर आलीय. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन कोणत्याही क्षणी अणूबॉम्ब टाकू शकतात, असा मोठा दावा यूक्रेनचे राष्ट्रपती बोलिदिमीर जेलेन्स्की यांचे माजी प्रवक्ते यूलिया मंडेल यांनी केलाय.
मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेलं हे भीषण युद्ध रोखण्यासाठी यूक्रेनसह जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत अद्याप दिसून येत नाहीत. अशावेळी अजून एक मोठी बातमी समोर आलीय. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन कोणत्याही क्षणी अणूबॉम्ब टाकू शकतात, असा मोठा दावा यूक्रेनचे राष्ट्रपती बोलिदिमीर जेलेन्स्की यांचे माजी प्रवक्ते यूलिया मंडेल यांनी केलाय. इतकंच नाही तर यूक्रेनसह अन्य देशांवरही अणुबॉम्ब हल्ला होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुतिन आण्विक हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. पोलंड, मोल्डोआ आणि फिनलँड हे देश पुतिन यांचं पुढील टार्गेट असू शकतात, असंही यूलिया यांनी म्हटलंय. तर पोलंडमधील 74 टक्के लोकांचं मत आहे की पुतिन आण्विक हल्ला करु शकतात.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

