AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात सदाभाऊ खोत यांचा समावेश करा; कोणी केलीय मागणी?

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात सदाभाऊ खोत यांचा समावेश करा; कोणी केलीय मागणी?

| Updated on: Jul 13, 2023 | 9:49 AM
Share

भाजप, शिंदे गटासह अजित पवार गटातील नेते हे मंत्री पद मिळावे म्हणून दबाव वाढवत आहेत. याचदरम्यान युतीतील मित्रपक्षांनी देखील आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं असं म्हणताना भाजपला इशारा दिला आहे.

सोलापूर : राज्यात तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडघम वाडले आहेत. भाजप, शिंदे गटासह अजित पवार गटातील नेते हे मंत्री पद मिळावे म्हणून दबाव वाढवत आहेत. याचदरम्यान युतीतील मित्रपक्षांनी देखील आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं असं म्हणताना भाजपला इशारा दिला आहे. यावरून माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोतांना मंत्री मंडळात स्थान द्या अशी आग्रही मागणी रयत क्रांती संघटनेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी रयत संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सुहास पाटील यांनी सोलापूरमध्ये केली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या सदाभाऊ खोत यांना मंत्री करण्याची मागणी करीत त्यांच्या नावाचा जयघोष करत घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Published on: Jul 13, 2023 09:49 AM