मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करावी; Sachin Kharat यांची मागणी

पडळकर वेळोवेळी आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत त्यामुळे असा व्यक्ती सभागृहात असणे हे लोकशाहीला घातक आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 07, 2022 | 1:51 AM

मुंबई : गोपीचंद पडळकर हे विधीमंडळामधील वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. या सभागृहात जी व्यक्ती समाजासाठी उल्लेखनीय कार्य करते अशा व्यक्तीला या विधानपरिषदमध्ये घेतात. परंतु पडळकर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. आदरनीय शरद पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पडळकर वेळोवेळी आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत त्यामुळे असा व्यक्ती सभागृहात असणे हे लोकशाहीला घातक आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें