Sadabhau Khot On Amol Mitkari | अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या फडातील नाचा- सदाभाऊ खोत
अमोल मिटकरी हे भाजप आणि इतर विरोधकांवर तुटून पडत असतात. विरोधकांना ते वेळोवेळी सडेतोड उत्तर देत असतात. मिटकरींची भाषण ऐकलायलाही मोठी गर्दी जमते. पण विरोधकांवर केलेलेल्या सततच्या टीकेने आणि आपल्या जहरी विधानेने ते नेहमी चर्चेत असतात. त्यावरूनच आता सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत.
नवनीत राणा यांची अटक, त्यांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीबाबत कथित आरोप, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला ही प्रकरण गाजत आहेत. यावरून सध्या आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता दुसरा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण रयत क्रांती संघटनेचे नेते आणि भाजपचे सहयोगी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरींवर जहरी टीका केली आहे. “अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही.” असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी हे भाजप आणि इतर विरोधकांवर तुटून पडत असतात. विरोधकांना ते वेळोवेळी सडेतोड उत्तर देत असतात. मिटकरींची भाषण ऐकलायलाही मोठी गर्दी जमते. पण विरोधकांवर केलेल्या सततच्या टीकेने आणि आपल्या वक्तव्यांनी ते नेहमी चर्चेत असतात. त्यावरूनच आता सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
