Nagraj Manjule : ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर आधारित चित्रपटाची कथा वादात सापडली आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. खाशाबा जाधव यांच्यावरील खाशाबा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सैराट सारखा सुपरहिट चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. तरूणाईसह अनेक जण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रेमात असून त्यांचा वेगळा असा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणारे नागराज मंजुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर आधारित चित्रपटाची कथा वादात सापडली आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. खाशाबा जाधव यांच्यावरील खाशाबा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांच्याकडून जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. दिग्दर्शक नागराज मुंजळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्याविरोधातही दावा दाखल करण्यात आला आहे. खाशाबा यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क २००१ पासून संजय दुधाणे यांच्याकडे असल्याची माहिती मिळतेय. तर चित्रपटाची निर्मिती, प्रदर्शन करण्यास मनाई आणि ठरावासाठी संजय दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदेंसह अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

