समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटलं…
गेल्या काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र यावर स्वतःआमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आपापल्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळण्यासाठी जनतेपर्यंत पोहचून मतदार राजाला मत देण्याचं आवाहन करत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र यावर स्वतःआमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, असेही अबू आझमी यांनी म्हटले आहे. आझमी म्हणाले, ‘मी कुठेही पक्ष सोडून जात नाही. खोट्या बातम्या पसरवल्या गेल्यात, प्रफुल पटेल यांची भेट कामानिमित्त घेतली आहे. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. रईस शेख यांनी राजीनामा का दिला माहिती नाही? मंत्री बनण्याची इच्छा असावी.’, असेही त्यांनी म्हटले.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा

शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट

पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का

'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
