वायकरांच्या उमेदवारीला मनसेचा विरोध, निरूपम महाराष्ट्रद्रोही तर…शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला
शिवसेनेकडून मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर शिवसेनेकडून अद्याप कोणताच उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर रवींद्र वायकर आणि संजय निरूपम यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू
संजय निरूपम यांच्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीलाही मनसेकडून विरोध दर्शवण्यात आलाय. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला हा विरोध दर्शविला आहे. संजय निरूपम यांचा महाराष्ट्रद्रोही तर रवींद्र वायकर यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केलाय. दरम्यान, शिवसेनेकडून मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर शिवसेनेकडून अद्याप कोणताच उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर रवींद्र वायकर आणि संजय निरूपम यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आता शालिनी ठाकरे यांच्या ट्वीटची चर्चा होतेय. ‘मनसेला ‘धनुष्य बाण’ चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये.’, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद

'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट

करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'

'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं
