AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी

Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी

| Updated on: Sep 08, 2026 | 3:14 PM
Share

संभाजी भिडे यांनी दहीहंडी सणात महिलांच्या नाचण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे, अशा कृती करणाऱ्यांना त्यांनी देशद्रोही म्हटले आहे. हिंदू सणांमधून डॉल्बी आणि डीजे पूर्णपणे काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली. डॉल्बीमुळे देशास कोणतीही बळकटी मिळत नसून, केवळ मूर्खपणा वाढत असल्याचे त्यांचे मत आहे.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दहीहंडी सणात महिलांच्या नाचण्यावर आणि डॉल्बी-डीजेच्या वापरावरून कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी अशा कृती करणाऱ्यांना देशद्रोही संबोधत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. हिंदू सणांमधून डॉल्बी आणि डीजे पूर्णपणे हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले की, दहीहंडी हा आपला संस्कृती आणि धर्म आहे. अशा कार्यक्रमांमध्ये महिलांना नाचवले जाणे हे योग्य नाही. “हा मूर्खपणा आहे. असे प्रकार करणारे देशद्रोही आहेत. जरी ते आपले असले तरी मूर्ख आहेत, त्यांना समजत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

डॉल्बी आणि डीजेच्या वापराबाबत बोलताना भिडे म्हणाले की, “या देशातील संबंध जनतेने डॉल्बी आणि डीजे फेकून दिले पाहिजेत.” आपल्या सर्व सणांमध्ये आणि उत्सवांमध्ये डॉल्बीची गरज नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “त्याचा उपयोग काय? देशाला त्यातून काय बळ मिळते? फक्त मूर्खपणा वाढतो,” असे त्यांचे मत आहे. या सर्व काळ्या शक्ती गाडण्यासाठी काही गोष्टींना नाकारले पाहिजे, ज्यात डॉल्बीचा समावेश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

Published on: Sep 08, 2026 03:14 PM

Follow Us