Daulatabad Fort : दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
Fire Breaks In Daulatabad Deogiri Fort : संभाजीनगरमधील दौलताबाद येथे असलेल्या देवगिरी या ऐतिहासिक किल्ल्याला भीषण आग लागली आहे. यामुळे ऐतिहासिक वास्तुचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
दौलताबादच्या देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग लागली आहे. आगीमुळे किल्ल्याच्या चारही बाजूंना धुराचे लोट पसरलेले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आज दुपारी भीषण आग लागली. या आगीमुळे किल्ल्याच्या चारही बाजूंनी धुराचे मोठे लोट उठलेले बघायला मिळाले. केवळ किल्ल्याचा परिसरच नाही तर देवगिरी किल्ला देखील आगीच्या विळख्यात आलेला यावेळी दिसला. किल्ल्यावर असलेले झाडं, गवत सगळच या आगीत जाळून राख झालं आहे. किल्ल्याच्या तिन्ही तटबंद्याच्या आतपर्यन्त ही आग पसरलेली आहे. या आगीमुळे देवगिरी किल्ल्याच्या या ऐतिहासिक वास्तुचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

