Special Report | समीर वानखेडेंचे वडील नेमके दाऊद की ज्ञानदेव?
एनसीबीचे अधिकारी समीन वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली.
एनसीबीचे अधिकारी समीन वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरु झालेली आहे. नवाब मलिकांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात काय हे समजत नाही. जातीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. नवाब मलिक मंत्री असून आकसापोटी किंवा जावयांना अटक केल्यामुळं असं करतायत का?, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचं दाखवलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं आहे. नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांना विचारून मी कोर्टात जाणार असल्याचं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले आहेत.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

