Special Report | नवाब मलिकांचे आरोप, क्रांती रेडकर माध्यमांवर भडकल्या
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते रोज नवा आरोप करत आहेत. काही कागदपत्रंही दाखवत आहेत. मात्र, त्यांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे आहेत. त्यात काही तथ्य नाही, असा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते रोज नवा आरोप करत आहेत. काही कागदपत्रंही दाखवत आहेत. मात्र, त्यांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे आहेत. त्यात काही तथ्य नाही, असा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे. क्रांती रेडकर यांनी सासरे ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. यावेळी त्या प्रसारमाध्यांवरही भडकल्या. तसेच रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचं वाटत असेल तर आम्ही जायचं कुठे? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहणं चुकीचं आहे का? आम्ही आठवलेंना सर्व कागदपत्रं दिली आहेत. नवाब मलिक मीडियासमोर काही कागदपत्रं दाखवत असतील आणि तुम्ही तेच सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा. माझी हातजोडून विनंती आहे, असं क्रांती म्हणाली.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

