‘पाणी द्यायचं नसेल तर…’, सांगलीच्या जत तालुक्यातील ग्रामस्थांचा पुन्हा सरकारला थेट इशारा
VIDEO | 'दुष्काळी भागाला पाणी द्या, अन्यथा...', जत तालुक्यातील ग्रामस्थांचा पुन्हा सरकारला इशारा
सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा राज्य सरकारला पुन्हा दिला आहे. यासाठी दुष्काळग्रस्तांनी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 हुन अधिक गावांनी सांगली जिल्ह्यातील संख येथे चक्री आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत पंचायत समितीचे माजी सभापती आणि जत तालुका कॉंग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडग, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ आणि नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी नेमकी काय भूमिका मांडली बघा व्हिडीओ…
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

