Suhas Babar Controversy : शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
सांगलीत शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी भाजप पदाधिकाऱ्याला उद्देशून केलेल्या आम्ही 242, म्हणून तुझा मुख्यमंत्री विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तणाव वाढला आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेतल्यावर बाबर यांनी हे विधान एका स्थानिक पदाधिकाऱ्यासाठी केले होते, मुख्यमंत्र्यांसाठी नव्हे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याला उत्तर देताना बाबर यांनी थेट भाजपला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरोधात लढत असल्याने हा वाद उफाळून आला आहे.
आमदार बाबर यांनी म्हटले होते की, “हा सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो, राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो, उबाठा पण चालवतो, शिवसेना पण चालवतो आणि भाजप पण चालवतो.” या विधानामुळे भाजपने तीव्र आक्षेप घेतला आणि शिंदे गटाच्या आमदारांना इशारा दिला. यानंतर, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकेरी भाषेत बोललो नसून, टीका फक्त एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यावर होती, असे स्पष्टीकरण सुहास बाबर यांनी दिले आहे. त्यांनी म्हटले की, ज्या पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली, त्याला उद्देशून तुझा हा शब्द वापरला होता. या प्रकारामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.
Published on: Feb 05, 2026 10:23 AM
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
