सत्य परेशान होता है पराजित नहीं…
आमचं कोणीही कितीही वाईट करायचा प्रयत्न करत असले तरी तसे काही होणार नाही आम्ही न्यायालयीन बाजू मांडू आमची बाजू आम्ही लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय नेते चिंतेत आहेत. याविषयी बोलताना सुनील राऊत यांनी सांगितले की, सत्य परेशान होता है, लेकिन पराजित नहीं होता असा टोला भाजप नेत्यांसह ईडीला लावला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असली तरी आमची ही लढाई 22 ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे. यावेळी त्यांनी ईडीवर ठपका ठेवत सांगितले की, ईडी ही चांगल्या माणसाला बरबाद करु शकते, आयुष्यातून कोणालाही उठवू शकते असं मत त्यांनी यावेळी मांडले. यावेळी त्यांना विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, आमचं कोणीही कितीही वाईट करायचा प्रयत्न करत असले तरी तसे काही होणार नाही आम्ही न्यायालयीन बाजू मांडू आमची बाजू आम्ही लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

