‘लाडक्या बहिणी-भावा’वरून राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर…
'लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये ? आणि लाडक्या भावांना ६ हजार आणि १० हजार रुपये देण्यात येणार आहे. पण खरी गरज ही लाडक्या बहिणींना आहे. ती घर चालवते. घरात नवरा, भाऊ बेरोजगार नोकऱ्या नाहीत. आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी २५ हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली या महाराष्ट्राची स्थिती'
लोकसभेच्या निवडणुका हरल्यावर लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका छोटा भाऊ, लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवतंय, असं शरद पवार काल म्हणाल्याचं संजय राऊत यांनी म्हटले. तर विरोधकांनी सरकारच्या योजनांवर टीका केली नाही. विरोधकांनी या योजनांसाठी वापरलेल्या सरकारी पैशाचं आणि निवडणुकीसाठी होत असलेल्या अशा राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे राऊत म्हणाले तर लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये ? आणि लाडक्या भावांना ६ हजार आणि १० हजार रुपये देण्यात येणार आहे. पण खरी गरज ही लाडक्या बहिणींना आहे. ती घर चालवते. घरात नवरा, भाऊ बेरोजगार नोकऱ्या नाहीत. आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी २५ हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली या महाराष्ट्राची स्थिती आहे, हे सगळे लाडके भाऊ आहेत, त्यांनाही दहा- दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा १० हजार रुपये टाका पंधराशे रुपयांनी काय होतं, पंधराशे रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालेल का? असा सवाल राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केला.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो

पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार

आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
