Sanjay Raut : रडीचा डाव आहे तर तुम्ही कोर्टात का गेलात, शिवसेना नेते संजय राऊतांचा दीपक केसरकरांना सवाल
ही कायदेशीर लढाई आहे. रडीचा डाव आहे तर मग तुम्ही कोर्टात का गेला? तो रडीचा डाव नव्हता का? कोर्टाने काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं हे आमचं कर्तव्य आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना फटकारलंय. ‘कुणाला उत्तर द्यायचं आता. पक्षाने उत्तर दिलं आहे. ही कायदेशीर लढाई आहे. रडीचा डाव आहे तर मग तुम्ही कोर्टात का गेला? तो रडीचा डाव नव्हता का? कोर्टाने काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं हे आमचं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले. आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. याेवळी त्यांनी नगरसेविका शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी बंड करून शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला आणि ते थेट पत्रकार परिषदेतून उठून गेले. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केलीय.
Published on: Jul 13, 2022 11:32 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

