Eknath Shinde : संजय राऊत ईडी कोठडीत, शिंदे गटात आनंद
शिंदे गटाचे संजय सिरसाठ म्हणाले, ही जी मस्ती आहे ना मस्ती मला नाही समजली ही मस्ती कशासाठी होती. कारवाईला कसं फेस करायचं. यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईडी कोठडीत गेलेत. त्यामुळं एकनाथ शिंदे गटात आनंद व्यक्त करण्यात येतोय. कर नाही, त्याला डर कशाला असं संजय राऊतचं म्हणत होते ना. ते म्हणत होते की, त्यांनी काहीचं केलं नाही. त्यांची चूक नाही. आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर संभुराज देसाई म्हणाले, यात काही तथ्य नसेल, तर चौकशीतून बाहेर येईल. एवढी नौटंकी करायची काय गरज. एखादा योद्धा लढाई जिंकून आल्यानंतर जसं वागतो, तशाप्रकारचे हातवारे ते करत होते. तर शिंदे गटाचे संजय सिरसाठ म्हणाले, ही जी मस्ती आहे ना मस्ती मला नाही समजली ही मस्ती कशासाठी होती. कारवाईला कसं फेस करायचं. यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

