कोश्यारींनी शिवरायांचा अवमान केला तेव्हा भाजपला गौरव यात्रा का काढावी वाटली नाही; संजय राऊतांचा सवाल
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला तेव्हा भाजप आणि शिवसेनेला तो अवमान वाटला नाही का? तेव्हा त्यांना ही गौरव यात्रा काढावी वाटली नाही का?शिवरायांचा अवमान तुम्हाला अवमान वाटत नाही का? , असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. राज्यात लवकरच सत्तांतर होणार आहे. लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार आहे, केंद्रातही बदल होतील. आघाडीचं सरकार सरकार सत्तेत येईल, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Mar 28, 2023 10:29 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
