AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Video : '... असं का ओरडला नाहीत?', धनंजय मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल

Sanjay Raut Video : ‘… असं का ओरडला नाहीत?’, धनंजय मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल

| Updated on: Jan 20, 2025 | 4:23 PM
Share

पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांना थेट सवाल केलाय.

शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणं चुकीचं, असं का ओरडला नाहीत? असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरही भाष्य केलंय. तर बीडमधील सरपंचाची हत्या कोणी केली? असाही थेट सवाल संजय राऊत यांनी केलाय. पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली.‘पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका पण त्यांनी ऐकलं नाही’, असा मोठा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. इतकंच नाहीतर मी अजित पवार यांना सांगितलं होतं हे षडयंत्र आहे, पण त्यांनी ऐकलं नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. तर 2019 साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. त्याला सुनील तटकरे हे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली. पण याची शिक्षा मात्र मला मिळाली, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. यानंतर संजय राऊत यांनी भाष्य करत धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय.

Published on: Jan 20, 2025 04:23 PM