Sanjay Raut LIVE | एक मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, संजय राऊतांची पुन्हा राणेंवर टीका
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी राणेंवर केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी राणेंवर केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

