अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
खासदार संजय राऊत यांनी कालच्या विमान अपघातावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. काल अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातावरून राऊत यांनी मोदी सरकारवर आज पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, विमान अपघाताचे कोणीही राजकारण करू नये. कारण मृत पावलेले हे भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते. यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतका मोठा तांत्रिक बिघाड झाला. जे विमान लंडनला चाललेले आहे त्याचे दोन्ही इंजिन बंद पडतात, तर कोणी म्हणतात पक्ष्याने धडक मारली, काहीही असो त्याचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर चौकशी होईल. पण इतका मोठा अपघात होतो. हा एक अपघात आहे आणि हा अपघात टाळता येत नाही, असे अमित शहा म्हणतात. रेल्वेचे अपघात टाळता येत नाही. पहलगामचा हल्ला टाळता येत नाही. अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
