Sanjay Raut | घटनादुरुस्तीचं विधेयक अपूर्ण आहे, राज्यसभेतून संजय राऊत LIVE
102व्या घटना दुरुस्ती विधेयक अपूर्ण असल्याचं सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत 102व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. तसचं घटनादुरुस्तीचं विधेयक अपूर्ण आहे, असंही ते म्हटले. आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभाग घेताना संजय राऊत यांनीही सहभाग घेतला.
तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

