Sanjay Raut Video : ‘फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्…’, शिवसेनेच्या नेत्यांच्या कुंभमेळा दौऱ्यावरून राऊतांचा निशाणा
शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार असल्याची माहिती काल सूत्रांकडून समोर आली. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना यावर सवाल केला असता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार असल्याची माहिती काल सूत्रांकडून समोर आली. शिवजयंती साजरी झाल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची चर्चा आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना यावर सवाल केला असता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘कुंभमेळ्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या त्या ४० आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही’, असं म्हणत शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांच्या कुंभमेळा दौऱ्यावर संजय राऊत यांनी खोचक टीका केली. इतकंच नाहीतर कुंभमेळ्याला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना एक पवित्र साबण द्यावा. सध्या कुंभमेळ्यात जे काही चाललंय. तुम्ही कितीही धुंतलं तरी तुमचं पाप काही धुतलं जाणार नाही. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला साधु-संत आणि पुण्यात्मे जेव्हा जातात, जो निष्पाप सामान्य माणूस असतो तो जातो तेव्हा त्याला पुण्य मिळतं. भ्रष्टाचारी, गद्दार, बेईमान लोकांना जर वाटत असेल की ते कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी गेले तर पुण्य मिळेल तर तसं नाहीये, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जिव्हारी लागणारी टीका केली.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
