Sanjay Raut | मला व्याख्यानाची सवय नाही, आपण भाषण करणारे व्यक्ती : संजय राऊत

आज समोर असलेले कॅमेरा वाले व्याख्यानाला आलेत की बातमीला,आपण भाषण करणारे व्याख्यान करणारे नाही,खूप कमी वेळा व्याख्यान दिलं आहे. माझी परंपरा अभ्यास करण्याची नाही. व्याख्यान अभ्यास करून द्यावं लागतात, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात आहेत. श्रमिक पत्रकार संघाच्या वतिनं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. आज समोर असलेले कॅमेरा वाले व्याख्यानाला आलेत की बातमीला,आपण भाषण करणारे व्याख्यान करणारे नाही,खूप कमी वेळा व्याख्यान दिलं आहे. माझी परंपरा अभ्यास करण्याची नाही. व्याख्यान अभ्यास करून द्यावं लागतात. आपण एवढया वर्ष पत्रकारिता केली आता एवढी माध्यमे आली मग वाटत एवढया दिवस झक मारली,मला लॅपटॉप वर लिहता येत नाही,पण मी लिहतो,आपण लिहायला विसरून गेलो आहे.मला एक गृहस्थ म्हटले पण चिंता वाटते आपण लिहायला विसरतो आहे  हे बदललं पाहिजे. माझी भाषा मराठी आहे मला लिहता आलं पाहिजे,याचा धोका प्रिंट मीडिया ला आहे, असं संजय राऊत म्हणाले. कोरोना मध्ये अनेक माध्यम बंद होती ती डिजिटल मध्ये आलं,पण त्यामुळे वृत्तपत्र कमी झाली. मोबाईल वर वृत्तपत्र वाचली गेली.मीडिया आता खूप मोठं झालाय.माझा मीडियाशी संबंध येतो त्याना रोज माझ्याकडून काही तर हवं असतं, असं संजय राऊत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI