बाकी सर्व गोष्टींचं स्मरण होतं, फक्त 12 आमदारांच्या यादीचंच विस्मरण होतं, संजय राऊत यांचा राज्यपालांना चिमटा
राज्यपालांकडे 12 आमदारांची यादी आहे. त्याचं आम्हीही स्मरण करून देत असतो. त्यांना बाकी सर्व गोष्टींचं स्मरण होतं. फक्त यादीचंच विस्मरण होतं, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काही गोष्टींचं स्मरण करून दिलं म्हणता. आम्हीही त्यांना स्मरण करून देत असतो. 12 आमदारांची यादी त्यांच्याकडे आहे. त्याचं आम्हीही स्मरण करून देत असतो. त्यांना बाकी सर्व गोष्टींचं स्मरण होतं. फक्त यादीचंच विस्मरण होतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
Follow Us
Latest Videos
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;

