AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्धा तास सेक्युरिटी बाजूला सोडून ये आधी तुलाच फोडेन... राऊतांचं बड्या मंत्र्याला खुलं आव्हान!

अर्धा तास सेक्युरिटी बाजूला सोडून ये आधी तुलाच फोडेन… राऊतांचं बड्या मंत्र्याला खुलं आव्हान!

| Updated on: Jun 18, 2026 | 3:06 PM
Share

ठाकरे गटातील 6 खासदार फुटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ठाकरे गटातील 6 खासदार फुटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “खाकी वर्दीची आणि ED, CBI ची मस्ती दाखवत आहात. लोक कसे फुटतात हे गिरीश महाजन सांगत आहेत. एक दिवस ED आणि CBI माझ्याकडे आली तर सर्वात आधी गिरीश महाजन यांनाच फोडून दाखवेन. सेक्युरिटी बाजूला करुन या मग राडा काय असतो हे सागंतो, चिंधी नाय उरणार अंगावर”

यावेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या कंत्राटांवरूनही गंभीर आरोप केले. “कुंभमेळ्याचे कंत्राट कुणाला दिले याची यादी माझ्याकडे आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच ठाण्यात नगरसेवकांना लपवून ठेवत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

राडेबाजीवर आव्हान देऊ नका, पोलीस बाजूला ठेवा आणि मग बोला, असेही राऊत म्हणाले. याशिवाय रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल वापरलेल्या भाषेवरही त्यांनी टीका केली. गद्दारी करणाऱ्यांवर प्रेम का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Jun 18, 2026 02:58 PM

Follow Us