Sanjay Raut | तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही; राऊतांचा बंडखोरांना इशारा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, आज सकाळी 11 वाजता संसदीय कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीत विविध राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात येणार असून, सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सावंत यांनी सांगितले की, व्हीप पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. “ई-मेल, व्हॉट्सअॅप तसेच प्रत्यक्ष व्हीप संबंधित खासदारांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पक्षफोडीच्या चर्चांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींना फोडण्याचे प्रयत्न होत असतील, तर तो लोकशाहीचा अवमान आहे. पक्षाच्या चिन्हावर आणि नेतृत्वाच्या मेहनतीवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनादेशाचा आदर करावा,” असे सावंत म्हणाले.
तसेच पक्षाच्या निर्देशांचे पालन न झाल्यास पुढील कायदेशीर आणि संघटनात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. “आता व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पक्षाच्या नियमांनुसार पुढील निर्णय घेतले जातील,” असे सावंत यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले, हे तोडणार, हे तोडणार, हे तोडणार, त्यांना वाटतं एकदा पक्ष फोडला पण आता मी बोलतोय तोडून दाखवा, तुम्हाला नाही तोडलं, तर शिवसेना आमच्या बापाचा नाव नाही सांगणार आणि आमच्या बापाचा नाव बाळासाहेब ठाकरे आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, बैठकीनंतर पक्षाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 18, 2026 10:42 AM
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
व्हॉट्सअप केलं, व्हीप जारी केला अन् फोनही... संजय राऊतांनी बैठकीआधीच द
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणा
तोडून दाखवा! नाही तोडलं तर शिवसेना आमच्या बापाचं नाव नाही

