Video : संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरसमोर चौकशी होण्याची शक्यता
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी होणार आहे. वर्षा राऊत आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना समन्स बजावलं. आता आज त्यांची चौकशी होणार आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. […]
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी होणार आहे. वर्षा राऊत आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना समन्स बजावलं. आता आज त्यांची चौकशी होणार आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. जवळपास 3 कोटींचा पैशांचा घोटाळा झाल्याचा हा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? याबाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांसह कुटुंबियांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे.
Published on: Aug 06, 2022 11:35 AM
Follow Us
Latest Videos
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
