AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Corona | पोटनिवडणुकीने पंढरपुरात वात पेटवली; संजय शिंदे,अमोल मिटकरी, मोहिते पाटलांना कोरोना

| Updated on: Apr 22, 2021 | 7:25 PM
Share

राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी,  भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur Mangalwedha by election) मोठ्या जोशात राबवली गेली. राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जोमात प्रचार केला. ऐन कोरोनाकाळात (Corona) मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी,  भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.