Sanjay Shirsat | निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?; नाशिक धर्मांतर प्रकरणावरून संजय शिरसाट आक्रमक SIT चौकशीची मागणी
नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित धर्मांतर प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एमआयएम पक्षावर निशाणा साधत धर्मांतर आणि तरुणींना फसवण्यामागे संघटित जाळे कार्यरत असल्याचा दावा केला.

“एमआयएमकडून अशा प्रकारच्या गतिविधी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे असे प्रकार त्यांच्या नेतृत्वाखाली घडत आहेत,” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. तसेच, या प्रकरणातील निदा खान ही केवळ एक छोटा मोहरा असून, यामागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला. शिरसाट म्हणाले की, “हे जाळे महाराष्ट्रभर पसरलेले आहे. नगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही अशा घटना पाहायला मिळू शकतात. हिंदू धर्माविरोधात विष पसरवण्याचे काम सुरू असून त्यामुळे समाजात संताप निर्माण होत आहे.”
दरम्यान, निदा खानला अटक करण्यात आली असून तिच्याकडून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी व्हावी आणि यामागील मास्टरमाइंड समोर यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.
Published on: May 08, 2026 11:11 AM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट