Sanjay Shirsat | तासाभरात सर्व स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा, नेमकं काय घडतंय?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना, शिवसेना (शिंदे गट) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य स्वतंत्र भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना, शिवसेना (शिंदे गट) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, “पुढील काही वेळात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ठाकरे गटाने संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात आणि त्यानंतर कोणती माहिती समोर येते, याकडे आम्ही तटस्थपणे पाहत आहोत.”
काही खासदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, “लोकसभा अध्यक्षांकडे नेमके कोणते निवेदन देण्यात आले आहे किंवा किती खासदारांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, याबाबत आमच्याकडे अधिकृत माहिती नाही. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.”
खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई होण्याच्या शक्यतेवर बोलताना शिरसाट म्हणाले, “संबंधित खासदारांना कायद्याची पूर्ण जाणीव आहे. त्यांनी जो निर्णय घेतला असेल, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारीही असेल.”
यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली. “सध्याच्या परिस्थितीत जे काही घडत आहे ते पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीचा विचार करावा,” असे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पुढील काही तासांत परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 18, 2026 01:02 PM
तासाभरात स्पष्ट होईल! 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा मोठा खुलासा....
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जलद घडामोडी! अधिकृत घोषणा कधी? नव्या
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर
वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना

