AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...हे तर किळसवाणं, बदलापूर अत्याचारातील सहआरोपी नगरसेवक! संजय शिरसाटांचा पारा चढला

…हे तर किळसवाणं, बदलापूर अत्याचारातील सहआरोपी नगरसेवक! संजय शिरसाटांचा पारा चढला

| Updated on: Jan 10, 2026 | 3:00 PM
Share

कुळगाव बदलापुरातील भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून तुषार आपटे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र अक्षय शिंदे लैंगिक प्रकरणातील तुषार आपटे हे सहआरोपी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद सुरु झाला आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कुळगाव बदलापुरातील भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून तुषार आपटे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र अक्षय शिंदे लैंगिक प्रकरणातील तुषार आपटे हे सहआरोपी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद सुरु झाला आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक करणं अत्यंत किळसवाणं आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना नगरसेवक करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे असंही शिरसाट म्हणाले. अशा पद्धतीचं राजकारण करणं गैर आहे, लोकांच्या भावनेचा तो अनादर आहे असं म्हणत शिरसाटांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. या निर्णयावर लोक जरूर संतापतील त्यामुळे असे निर्णय घेण्याआधी पक्षांनी सर्व लोकांची पार्श्वभूमी काय आहे ते पाहिली पाहिजे.

Published on: Jan 10, 2026 03:00 PM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!