Kulgaon-Badlapur Municipality : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी भाजपचा थेट स्वीकृत नगरसेवक! किशोरी पेडणेकर भडकल्या म्हणाल्या…
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या मते, त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली होती. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र शब्दांत टीका करत आपटेंना विकृत नगरसेवक संबोधले.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून तुषार आपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार आपटे हे बदलापूर येथील अक्षय शिंदे लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहेत. शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, ज्यात आपटे यांचाही समावेश होता.
भाजपने स्पष्ट केले की, तुषार आपटे यांनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केली होती, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे. मात्र, लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक बनवल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या नियुक्तीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही नाईन मराठीशी बोलताना त्यांनी म्हटले की, “ते स्वीकृत नगरसेवक नाहीत, ते विकृत नगरसेवक आहेत.” भाजप गुंड, पुंड आणि अत्याचारी लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही पेडणेकर यांनी यावेळी केला. त्यांनी स्थानिक नागरिकांना याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
डोळ्यात अश्रू नाही तर अंगार... उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत
दादा-ताई एकत्र, पुण्यात मेट्रो-बस फ्री! दादांच्या घोषणेवर BJPचा आक्षेप
ठाकरे गटाचे दगडू सकपाळ शिंदेसेनेत, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड

