नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट! 25 कर्मचारी अडकले
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात स्फोटकं बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. डिटोनेटर बनवताना हा स्फोट झाल्याची माहिती असून, २५ मजूर आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटकं तयार करणाऱ्या या कंपनीमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे २५ मजूर आत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. पोलीस प्रशासन आणि बचाव पथके तातडीने पोहोचले असून, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही एसबीएल कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली होती, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बीडीडी चाळीतील 864 घरांचे वितरण, फडणविसांच्या हस्ते दिल्या चाव्या!
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ

