AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना भवनावर दावा करणार का?; ते आमच्यासाठी मंदिर... शिंदेगटातील नेत्याचं वक्तव्य

शिवसेना भवनावर दावा करणार का?; “ते आमच्यासाठी मंदिर…” शिंदेगटातील नेत्याचं वक्तव्य

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 20, 2023 | 3:06 PM
Share

शिंदेगटाचे नेते संजय शिरसाठ यांनी ठाकरेगटावर निशाणा साधलाय. संजय राऊतांवरही त्यांनी निशाणा साधलाय. ते काय म्हमालेत? पाहा...

मुंबई : शिंदेगटाचे नेते संजय शिरसाठ यांनी ठाकरेगटावर निशाणा साधलाय. “शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदीर आहे. आम्ही कधीच त्याच्यावर दावा केला नाही. ज्यांना पैशांचा लोभ आहे, त्यांची ती प्रॉपर्टी आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये वाद होणार नाहीत”, असं संजय शिरसाठ म्हणालेत. “संजय राऊताच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांच्यावर मला बोलायचं नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई कशी होईल, हे आम्ही पाहतोय. मुख्यमंत्री यांच्याबाबत राऊतांनी जी भाषा वापरली ती योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल ही झालेले आहेत. संजय राऊतांना 8 दिवसात आम्ही उत्तर देऊ”, असंही शिरसाट म्हणालेत.

Published on: Feb 20, 2023 03:02 PM

Follow Us