शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे नुकत्याच झालेल्या दीपक केसरकर यांच्या आमसभेदरम्यान शिंदे सेना आणि भाजपमध्ये तू तू मै मै झाल्याची चर्चा होती. यावर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही केवळ भासाभासी होती आणि कोणताही मोठा प्रकार घडला नसल्याचे परब यांनी सांगितले. आरोग्याच्या एका विषयावरून एका व्यक्तीने अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला थांबवले, […]
सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे नुकत्याच झालेल्या दीपक केसरकर यांच्या आमसभेदरम्यान शिंदे सेना आणि भाजपमध्ये तू तू मै मै झाल्याची चर्चा होती. यावर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही केवळ भासाभासी होती आणि कोणताही मोठा प्रकार घडला नसल्याचे परब यांनी सांगितले. आरोग्याच्या एका विषयावरून एका व्यक्तीने अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला थांबवले, ज्यामुळे गैरसमज निर्माण झाले. परंतु, नंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकत्र बसून गैरसमज दूर केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परब यांनी निलेश राणे यांच्या विकासकामांवरून वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. वैभव नाईक हे आमदार कसे झाले, हा संशोधनाचा विषय आहे. निलेश राणे साहेब दोन वर्षांपासून आमदार आहेत आणि त्यांनी केलेली कामे ही त्यांच्याच कारकिर्दीतील आहेत. वैभव नाईक यांनी दहा वर्षे सभागृहात कधीही विकासकामांवर आवाज उचलला नाही, असा आरोप संजू परब यांनी केला. भविष्यात शिंदे सेना आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि इतर पक्षांसोबतची रस्सीखेच ही राजकारणाची खरी मजा असल्याचे परब यांनी नमूद केले.
Published on: Aug 18, 2026 03:09 PM
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात

