Shirish Maharaj More Video : अवघ्या काहीच दिवसांवर लग्न अन्… हभप शिरीष महाराज मोरेंनी का संपवलं जीवन?
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या... आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट... तीर्थक्षेत्र देहू गावावर कोसळला दुःखाचा डोंगर.. घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. महाराजांचा नुकताच टिळा देखील झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, काल रात्री जेवण केल्यानंतर शिरीष महाराज मोरे झोपायला गेले होते. मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. हभप शिरीष महाराज हे प्रसिद्ध प्रवचन आणि कीर्तनकार त्याचप्रमाणे शिव व्याख्याते देखील होते. या घटनेने मोरे कुटुंबियांसह संपूर्ण देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या दुःखातून सावरण्यासाठी मोरे कुटूंबियांना वेळ द्यावा असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांच्या चाहत्यांना मोरे कुटुंबियांनी केली आहे.

'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा

विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”

राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली

बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
