Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarpanch Attack Video : लोखंडी रॉड डोक्यात घातला अन्... संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात पुन्हा थरार, आता 'या' सरपंचावर जीवघेणा हल्ला

Sarpanch Attack Video : लोखंडी रॉड डोक्यात घातला अन्… संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात पुन्हा थरार, आता ‘या’ सरपंचावर जीवघेणा हल्ला

| Updated on: Mar 06, 2025 | 1:46 PM

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची नुकतीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणानंतर अद्याप महाराष्ट्रातील थरार काही संपताना दिसत नाही.  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची नुकतीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. निलेश देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी रोड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला असून सरपंच आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते. तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिनमध्ये जेवायला बसलेले होते. मात्र दोन्ही गटात यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या शुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिसांची कोणतीच भीती उरली नसल्याचा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.  याप्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Mar 06, 2025 01:46 PM