Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna Kailash Borade Video : 'मला चटके देताना एवढंच म्हणायचे...', गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती

Jalna Kailash Borade Video : ‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती

| Updated on: Mar 06, 2025 | 12:16 PM

तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा उद्रेक झाला. जालना जिल्ह्यातील अनवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे नावाचा व्यक्ती शिरला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून कैलास बोराडेला तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण

जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा उद्रेक झाला. जालना जिल्ह्यातील अनवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे नावाचा व्यक्ती शिरला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून कैलास बोराडेला तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केली अशी माहिती समोर आली होती. या घटनेत आरोपीने अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचे व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर आणि राजकीय नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून व्हायरल होताना दिसतोय. सध्या या गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या फोनवरून जखमी कैलास बोराडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी करू नको, एकनाथ शिंदे तुझ्यासोबत असल्याचे म्हणत धीर दिला होता. दरम्यान, कैलास बोराडे या व्यक्तीने त्याच्यावरील आपबीती सांगितली.

Published on: Mar 06, 2025 12:16 PM