Eknath Shinde Video : ‘मी तुझ्यासोबत…’, लोखंडी सळईचे चटके दिलेल्या जखमी तरूणाला एकनाथ शिंदेंचा थेट फोन, नेमकं प्रकरण काय?
जालना जिल्ह्यातील आनवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे नावाचा व्यक्ती शिरला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून कैलास बोराडेला तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याची घटना घडल्याचे पाहायला मिळाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक व्हिडीओ समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला अन् राज्यात पुन्हा उद्रेक झाला. जालना जिल्ह्यातील आनवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे नावाचा व्यक्ती शिरला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून कैलास बोराडेला तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याची घटना घडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत आरोपीने अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या प्रकरणी पोलिसांनी सोनू उर्फ भागवत दौड या आरोपीला अटक केले असून त्याचा भाऊ उबाठा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी जालन्यातील पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या फोनवरून जखमी कैलास बोराडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी करू नको, एकनाथ शिंदे तुझ्यासोबत आहे. असा धीर दिला. तर यासंदर्भात जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोललो असल्याचे यावेळी जखमी कैलास बोराडे यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे पाहायला मिळाले.

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका

आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'

चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
