Amravati | मी पळून गेले नव्हते, पीडित मुलीचा सातारा पोलिसांकडे जवाब नोंदवला

स्वत:हून रागातून घरुन निघाल्याचा तरूणीने सातारा पोलिसात जवाब नोंदवला. खासदार नवनीत राणा व भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी लव जिहाद झाल्याचा आरोप केला होता.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 09, 2022 | 10:01 PM

अमरावती : अमरावतीमधील लव्ह जिहादचा आरोप झालेले प्रकरणी संबंधीत तरुणीनेच खुलासा केला आहे. मी कोणाच सोबत पळून गेली नव्हती; मी विनंती करते की माझ्याबद्दल जी बदनामी झाली ती बंद करा. मी घरुन माझ्या शिक्षणासाठी निघून गेली होती. फक्त माझी बदनामी केली गेली तसं काहीच नाही. मला फक्त कोर्स करायचा होता बाकी काही नाही. मुलीची tv9 मराठी कडे प्रतिक्रिया. अखेर चार दिवसांनंतर तरुणी अमरावतीत पोहचली. पहाटे चार वाजता तरूणीला अमरावती पोलिस साताऱ्यावरून अमरावतीला घेऊन आले. राजपेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा जबाब नोंदवला. स्वत:हून रागातून घरुन निघाल्याचा तरूणीने सातारा पोलिसात जवाब नोंदवला. खासदार नवनीत राणा व भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी लव जिहाद झाल्याचा आरोप केला होता.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें