महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच… इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. फक्त सांगलीतच नाही तर नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. फक्त सांगलीतच नाही तर नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून सांगलीतील निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत असल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे. यावरून राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.
“आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल,” असे म्हणत शंभुराज देसाई यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद दिला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप त्यांच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना पर्यटनासाठी घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत माहिती नसल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच शिंदे गटाची कोअर कमिटी बैठक पार पडली असून उद्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Jun 15, 2026 01:45 PM
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या

