Satej Patil | कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसची : सतेज पाटील – tv9

कोल्हापूर उत्तर विधानसभेची (North Kolhapur) जागा बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटणार असल्याची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 24, 2022 | 9:34 PM

कोल्हापूर : गेल्या विधान परिषदेवेळी कोल्हापुरात साटलोटं करत कोल्हापूर विधान परिषद सतेज पाटलांनी (Satej patil) बिनविरोध करून दाखवली आणि आता हाच प्लॅन सतेज पाटलांकडून पुन्हा आखण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची (North Kolhapur) जागा बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटणार असल्याची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी ही चर्चा करणार असेही पाटील म्हणाले आहेत. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामळे येत्या आठवड्यात या जागेसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्याचबरोबर पाच राज्याच्या निवडणुकीदरम्यान शेवटच्या टप्प्यात कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें