… तरीही माझ्या लेकीसह मला भाजपची ऑफर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मोठ्या विधानानं चर्चा
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. सुशीलकुमार शिंदे यावर बोलताना म्हणाले, भाजपची ऑफर आहे, पण आता ते कसं शक्य आहे?
सोलापूर, १७ जानेवारी २०२४ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदेला आणि मला भाजपची ऑफर आहे, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. सुशीलकुमार शिंदे यावर बोलताना म्हणाले, भाजपची ऑफर आहे, पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीत वाढलो. जिथे आमचं बालपण आणि तारुण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार? तुम्हाला हेही माहिती आहे की, प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

