Shanishignapur Video : शनिशिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेलानेच अभिषेक, देवस्थानाने का घेतला निर्णय?
गेल्या १५ फेब्रुवारी रोजी शनिशिंगणापूर येथील शनि देवाला इथूनपुढे शुद्ध तेलाचा तैलाभिषेक करण्याचा निर्णय शनिशिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला असून त्याची अमंलबजावणी आजपासून करण्यात येत आहे.
शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी शनिशिंगणापूरच्या देवस्थानाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गेल्या १५ फेब्रुवारी रोजी शनिशिंगणापूर येथील शनि देवाला इथूनपुढे शुद्ध तेलाचा तैलाभिषेक करण्याचा निर्णय शनिशिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला असून त्याची अमंलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. शनिशिंगणापूरच्या शनि देवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. दरम्यान, शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनि देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
