Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shanishignapur Video : शनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानाच्या निर्णयानं चर्चा

Shanishignapur Video : शनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानाच्या निर्णयानं चर्चा

| Updated on: Feb 15, 2025 | 11:32 AM

शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्यतेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

अहिल्यानगर अर्थात अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या शनिशिंगणापूरच्या देवस्थानासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. शनिशिंगणापूरच्या शनि देवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक कऱण्यात येणार आहे. शनिशिंगणापूर येथील शनि देवाला इथूनपुढे शुद्ध तेलाचा तैलाभिषेक करण्याचा निर्णय शनिशिंगणापूरच्या देवस्थानाकडून घेण्यात आला आहे. शनिशिंगणापूरच्या शनि देवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. दरम्यान, शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनि देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या नव्या नियमांनुसार, एक मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. मात्र, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on: Feb 15, 2025 11:32 AM