Sharad Pawar | विधानसभा पराभूत उमेदवारांची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे.
पुढच्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. तसंच पाच महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसंच विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष सोपविण्याची शक्यता आहे.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

