‘राष्ट्रवादीवर बोलणारे अमोल मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात कोण ओळखतं का?’, कोणी केला हल्लाबोल?
अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे-पाटील यांची स्वतःची किंमत काय? अमोल मिटकरी यांना अकोल्यात कोण ओळखतं का? कोणी केला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल?
‘राष्ट्रवादीवर बोलणारे अमोल मिटकरी कोण?’, असं वक्तव्य करत शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाहीतर अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे-पाटील यांची स्वतःची किंमत काय? अमोल मिटकरी यांना अकोल्यात कोण ओळखतं का? असा सवाल करत अंकुश काकडे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘अजित दादा यांच्या पक्षातले पदाधिकारी हे म्हणतात दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं. पण शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र आले तर अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे-पाटील यांची कुचंबना होणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊ नये अशी त्यांची मनातून इच्छा असणे स्वाभाविक आहे ‘, असंही अंकुश काकडे म्हणाले. तर अमोल मिटकरी सारख्यांना मी फारशी किंमत देत नाही, असेही ते म्हणाले. चक्की पीसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. नरेंद्र मोदी अजित पवरांना घेतात, एकमेकांवर केलेल्या टीकेला आज महत्त्व राहिलं नाही. काल केलेली टीका उद्या स्तुतिसुमने होऊ शकतात, असं सूचक वक्तव्यही अंकुश काकडे यांनी केलं आहे.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

