Sharad Pawar : 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, ‘निव्वळ अशक्य’
Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पवार यांना विचारण्यात आले.
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात राज्यात निवडणुका लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानुषंगाने इच्छूकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी निवडणुकीवरून सुरू असलेल्या अफवांवर भाष्य केलं आहे. येत्या 15 दिवसात निवडणुका (election) होणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या निवडणुका 15 दिवसात का होणार नाहीत? कोर्टाचा नेमका निर्णय काय आणि त्याचा काय अर्थ काय हे सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या विधानामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
Published on: May 10, 2022 12:37 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

